Friday 27 February 2009

२७ फेब. १७३१



२७ फेब.- आज मराठी भाषा दिन.. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ... !


२७ फेब. १७३१ - शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

Wednesday 25 February 2009

२६ फेब १९६६


२६ फेब १९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.


शनिवारी सकाळी १०-३० वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी देह-विसर्जन.
२७ ला महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना.
मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार.

Saturday 21 February 2009

२५ फेब. १८१८





२५ फेब. १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब. ला चाकणचा किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.

२४ फेब. १६७०

२४ फेब. १६७० - राजगड येथे राजाराम यांचा जन्म .

पालथे जन्मल्यामुळे राजांनी " पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले ...! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील ... !" असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले.
पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.

२३ फेब. १७३९

२३ फेब. १७३९ -चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.

चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

Friday 20 February 2009

२१ फेब. १७०७


२१ फेब्रुवरी १७०७ - औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर.

श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.

Thursday 19 February 2009

१९ फेब. १६३०

खर तर मराठ्यांचा इतिहास खूप जुना आहे. पण मी मध्ययुगीन इतिहासावर लक्ष्य केंद्रित करून हा ब्लॉग लिहतोय. साधारणपणे १५वे ते १९वे शतक. ह्या ४०० - ५०० वर्षामधल्या घडामोडींचा जमेल तसा परिचय आपण करून घेणार आहोत. माझ्या वाचनात आलेल्या प्रत्येक पुस्तकातून केलेल्या नोंदी मी येथे मांडणार आहे. आपणास कोठेही काही चुक लक्ष्यात आल्यास कृपया मला ती कळवावी ही नम्र विनंती. तसेच त्या तारखेस काही नवीन घडलेले माहिती असल्यास ते सुद्धा कळवावे ... !

चला तर मग श्री शिवछत्रपती महाराज जयंती पासून श्रीगणेशा करूया ... !

१९ फेब. १६३० - श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस , किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )


***********************************************************************************