Friday 23 October 2009

२४ ऑक्टोबर १६५७

२४ ऑक्टोबर १६५७ - शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर  भाग काबीज केला.

औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.

२३ ऑक्टोबर १६६२

२३ ऑक्टोबर १६६२ - छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये 'रोहिडखोरे - कारी' येथील देशमूख 'सर्जेराव जेधे' यांना पत्र लिहिले.


१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

संपूर्ण पत्र 'येथे' वाचू शकता ...

Friday 16 October 2009

१६ ऑक्टोबर १६७०

१६ ऑक्टोबर १६७० - मुघल सुभेदार दाउद खानला बाकीखान येउन मिळाला. दुसऱ्यादा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर निघाले होते. शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक ह्या मोघली भागात अडवण्यास सांगितले होते.

सर्वात पुढे असणाऱ्या इखलास खान मियाना याने मात्र दाउदखानाची वाट न बघता मराठ्यांच्या १५ हजाराच्या फौजेवर हल्ला चढवून मोठी घोडचुक केली. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. काही वेळात दाउद खानच्या सोबत असलेल्या बुंदेलेंच्या फौजेने मराठ्यांना काही प्रमाणात रोखले. संपूर्ण दिवसात मराठ्यान्नी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहू बाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैरान करून सोडले. संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटी सकट पुढे सटकले.



Monday 5 October 2009

५ ऑक्टोबर १६७०

५ ऑक्टोबर १६७० - दुसर्यांदा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर. दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.

शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक येथे अडवण्यास सांगितले. मुघलांची लढाईची पूर्ण तयारी नव्हती. मराठा फौज मात्र लढाईसाठी सज्ज झाली होती.

Saturday 3 October 2009

३ ऑक्टोबर १६७०

३ ऑक्टोबर १६७० - शिवाजी राजांनी सूरत पुन्हा एकदा लुटली. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या समवेत १०००० घोडदळ आणि १०००० पायदळ घेउन पहिल्या सूरत लुटीवेळी घेतलेल्या मार्गानेच राजे ३ ऑक्टोबर रोजी सूरत येथे पोचले.

सूरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -

"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे."


ह्या पत्रामध्ये शिवाजी राजांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.

” I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.”
.
.