Sunday 29 November 2009

२९ नोव्हेंबर १७२१

२९ नोव्हेंबर १७२१ - ठरल्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीझ एकत्रितपणे मराठ्यांच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईहून निघाले. मोहिमेची योजना प्रत्यक्षात आणून पहिला हल्ला मात्र त्यांनी २४ डिसेंबरला केला.

आंग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारापुढे इंग्रज आणि पोर्तुगीझ यांच्या संयुक्तफौजांचे सुद्धा काही चालले नाही. ४ दिवसात धूळधाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगिझान्ना पेशवे थोरले बाजीराव यांच्याबरोबर तह करावा लागला.

Saturday 28 November 2009

२८ नोव्हेंबर १६५९

२८ नोव्हेंबर १६५९ - अफझलखान वधापाठोपाठ शिवरायांनी आदिलशाही मुलुखावर तूटून पडत कोल्हापुर प्रान्त आणि पन्हााळा जिंकला.


२८ नोव्हेंबर १६७० - ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी. पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली ज्यामुेळ सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली.

.
.

Wednesday 25 November 2009

२५ नोव्हेंबर १६८३

२५ नोव्हेंबर १६८३ - छत्रपति संभाजी राजांनी पोर्तुगीज विरोधी गोवा स्वारीत कुंभारजुव्याचा  किल्ला जिंकला.

Sunday 22 November 2009

२० नोव्हेंबर १६६६

२० नोव्हेंबर १६६६ - ९ वर्षाचे शंभूराजे मार्गशिर्ष शु. ५ शके १५८८ रोजी आग्र्याहून सुखरूप राजगडी परत.
२० नोव्हेंबर १६७९ - संभाजी राजे दिलेरखानाच्या छावणीतून पळाले आणि त्यांनी पन्हाळा गाठला.

२० नोव्हेंबर १६६५ - पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेतोजी पालकरसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूर स्वारीसाठी रवाना. ही मोहिम पुढे १६ जानेवारी १६६६ पर्यंत सुरू होती.

Tuesday 10 November 2009

११ नोव्हेंबर १६५९

११ नोव्हेंबर १८१८ - शनिवारवाडा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात. पेशवाईचा अंत.

११ नोव्हेंबर १६७९ - मराठ्यान्नी 'खांदेरी'येथील इंग्रजांविरुद्धचे युद्ध जिंकले. 'डोव्ह' नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी-विदेशी सैनिक कैदी म्हणुन ताब्यात. या युद्धामुळे इंग्रजांना मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य पटले आणि २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.

Monday 9 November 2009

१० नोव्हेंबर १६५९ - शिवप्रतापदिन.

१० नोव्हेंबर १६५९ - शिवप्रतापदिन. मार्गशिर्ष शु. ६ शके १५८१ रोजी शिवरायांच्या हातून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध.

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।

एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥

... कविराज भुषण

भाषांतर :

यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.

अधिक वाचा ... http://shreeshivchatrapati.blogspot.com/2009/02/9-afzalkhan-meet-10th-nov-1659.html

Saturday 7 November 2009

७ नोव्हेंबर १७६२

७ नोव्हेंबर १७६२ - राघोबादादाचा पुण्यावर हल्ला. पेशवे माधवराव यांच्याबरोबर घोडनदीची लढाई. ५ दिवसात १२ नोव्हेंबर रोजी आळेगाव येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यास शरण.

Tuesday 3 November 2009

३ नोव्हेंबर १६८९

३ नोव्हेंबर १६८९ - मुघल सरदार एतिकादखानाचा राजधानीच्या किल्ले रायगडास वेढा.

२ नोव्हेंबर १७६३

२ नोव्हेंबर १७६३ - मराठे आणि निजाम यांच्यामधल्या राक्षसभुवन येथील लढाईवरुन पेशवे माधवराव यांचे पुण्यात आगमन.

१ नोव्हेंबर १७१८

१ नोव्हेंबर १७१८ - फसलेल्या 'विजयदुर्ग' मोहिमेनंतर इंग्रजांनी ४ महीने तयारी करून प्रचंड ताकदीने 'खांदेरी'वर आक्रमण केले.
पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली. 'रामा कामती' नामक मुंबईच्या एका व्यापाऱ्याला फितुरी करून मराठ्यांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन इंग्रजांनी अटक केले. त्यावर खटला चालवून कारावासाची शिक्षा ठोठावली आणि कैदेत घातले. पुढे १० वर्षांनी तो कारावासामध्येच वारला.