Thursday, 24 September 2009
२४ सप्टेंबर १६७४
२४ सप्टेंबर १६७४ - छत्रपति शिवरायांनी रायगडावर 'तांत्रिक पद्धतीने' स्वतःस पुन्हा राज्याभिषेक करून घेतला. नाशिक येथील निश्चलपुरी गोसावींच्या सांगण्यावरुन त्यांनी हा राज्याभिषेक केला.
Tuesday, 22 September 2009
२२ सप्टेंबर १६६०
२२ सप्टेंबर १६६० - शिवाजी राजांच्या आज्ञेने पन्हाळगड सिद्दी जौहरच्या स्वाधीन.
१२ जुलै १६६६० ला पन्हाळावरुन निसटल्यावर शिवरायांना मुघलांशी लढायला वेळ हवा असल्याने आदिलशाहीकडून थोडी स्वस्थता हवी होती. योग्य राजकारण करून राजांनी पन्हाळगड सिद्दी जौहरच्या म्हणजेच आदिलशाहीच्या स्वाधीन केला.

Sunday, 13 September 2009
१३ सप्टेम्बर १७२०
१३ सप्टेम्बर १७२० - १७१८ मधले २ हल्ले फसल्यावर इंग्रजांनी आंग्र्याँबरोबर तह केला.
पण १७२० मध्ये एका बाजूला बोलणी तर दूसरीकड़े लढाईची तयारी करत ते 'घेरिया'कड़े निघाले. मात्र आंग्र्यांची लढाईची तयारी बघून ते घेरिया सोडून देवगडावर हल्ला करायला सरकले.

Friday, 11 September 2009
१२ सप्टेम्बर १६६६
१२ सप्टेम्बर १६६६ - आग्र्याहून स्वतःची सुटका करून शिवाजी राजे राजगडी सुखरूप परतले.
१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी राजे व बाळ शंभूराजे पेटार्यासह आग्र्याहून निसटले होते. तर २० ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले होते. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.

Thursday, 10 September 2009
११ सप्टेम्बर १६७९
११ सप्टेम्बर १६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला.
इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

Wednesday, 9 September 2009
९ सप्टेम्बर १६७१
९ सप्टेम्बर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे.
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"

Tuesday, 8 September 2009
७ सप्टेम्बर १६७९
७ सप्टेम्बर १६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
७ सप्टेम्बर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.

Friday, 4 September 2009
५ सप्टेम्बर १६५९
५ सप्टेम्बर १६५९ - शिवरायांच्या पत्नी आणि शंभूराजांच्या आई महाराणी सईबाई यांचा दीर्घ आजाराने राजगडावर (की पायथ्याला ???) मृत्यू.
४ सप्टेम्बर १६५६
४ सप्टेम्बर १६५६ - मे १६५६ मध्ये रायरी ताब्यात घेतल्यावर शिवरायांनी 'रायरी'चे 'रायगड' असे नामकारण केले.
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

Subscribe to:
Posts (Atom)