Monday, 24 August 2009

२० ऑगस्ट १६६६

२० ऑगस्ट १६६६ - शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले. ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.

तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.

१७ ऑगस्ट १६६६

१७ ऑगस्ट १६६६ - शिवाजी राजे व बाळ शंभूराजे पेटार्‍यासह आग्र्याहून निसटले.

Also Read -

Visit To Agra – Threat To Life ...


Escape From Agra… The Route ...

१५ ऑगस्ट १६६४

१५ ऑगस्ट १६६४ - आदिलशाही सरदार खवासखानाला हुसकावून शिवाजीराजांनी कूड़ाळ-सावंतवाडी जिंकली.

खवासखान बाजी घोडपडेला येउन मिळण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पराभूत केले.

शत्रूला एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा फडशा पाडणे यात राजांचे रणकौशल्य दिसून येते.

१४ ऑगस्ट १६६०

१४ ऑगस्ट १६६० - 'चाकण उर्फ़ संग्रामदुर्ग' अखेर महत् प्रयासाने मुघलांनी जिंकला.

शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्राम दुर्गावर. राजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेद्यात होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.

किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होउन शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.

८ ऑगस्ट १६४८

८ ऑगस्ट १६४८ - पुरंदर - खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवाजी राजांकडून सपशेल पराभव.

फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

Thursday, 6 August 2009

६ ऑगस्ट १६५९

६ ऑगस्ट १६५९ - ६ ऑगस्ट १६५९ - ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले.

शिवरायांनी १६५७ पासून कल्याण - भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले.

सदर पत्राचा मराठी अनुवाद -

"शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत."

Saturday, 1 August 2009

१ ऑगस्ट १९२०

१ ऑगस्ट १९२० - 'लोकमान्य टिळक' यांची पुण्यतिथी...