Monday 24 August 2009

२० ऑगस्ट १६६६

२० ऑगस्ट १६६६ - शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले. ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.

तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.

No comments:

Post a Comment