१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.
१६ मे १६४९ - विजापुरच्या आदिलशहा कडून शहाजीराजांची सुटका झाली. शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
१९ मे १६७४ - शिवाजी महाराजांनी राजाभिषेकाच्या आधी प्रतापगडावरील भवानी मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.
२० मे १६६५ - राजगडाहून शिवाजी महाराजांनी आपले वकिल रघुनाथपंत 'पंडितराव' यांस मिर्झाराजा जयसिंह यांच्याकडे पुरंदर तहासंदर्भात बोलणी करण्याकरिता रवाना केले.
२१ मे १६७४ - शिवाजी महाराज प्रतापगडाहून रायगडास निघाले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.
.
.
क्रमश: .....
१७ मे १७८२: सालबाईचा तह. पहिल्या पेशवे- इंग्रज युद्धाची अखेर सालबाईच्या तहाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा पेशवे - शिंदे - होळकर यांनी वडगाव येथे पराभव केला.
ReplyDeletekhoop chan aahe tumcha blog marathi dinvishesh sanganara and marathi history baddal,
ReplyDeleteadded it to marathisuchi.com
visit http://www.marathisuchi.com/page.php?page=widget to publish your posts automatically to www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator
मित्र २१ तारखेच्या पुढचा इतिहासपण जाणून घ्यायचा आहें
ReplyDelete