दहादिशांनी एकमुखाने एकघोष केला...
मरणपाश तोडून राजसा सिंह मुक्त जाहला...
पंखामधले जागे जाहले उद्दानाचे भान...
गरुड़भरारीसाठी जाहले पुन्हा खुले अस्मान...
जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराजाभिषेक दिनाच्या शुभेच्छा ... हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.
क्षत्रिय कुलावतंस,गोब्राह्मण प्रतिपालक,सिंहासनस्थ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
ReplyDeleteJai Bhavani jai Shivaji
ReplyDeleteजय जय जय जय जय भवानी.....
ReplyDeleteजय जय जय जय जय शिवाजी ..... !!!!!