जलदुर्ग खांदेरी. समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला. उदिष्ट्ये २ होती. एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन. सध्या पाहूया त्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या. बघुया त्या नेमक्या काय होत्या.
२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.
९ सप्टेंबर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे."
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"
७ सप्टेंबर१६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
११ सप्टेंबर१६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला.
इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.
७ सप्टेंबर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.
खांदेरी संदर्भात झालेल्या लढायांचे विस्तृत वर्णन लवकरच 'इतिहासाच्या साक्षीने' या ब्लोगवर येईलच.
किती दूरदृष्टी होती नाही का शिवाजी महाराजांत?
ReplyDeleteरोहन, ही इतिहासाची उजळणी खूप आनंद देऊन जाते....परंतु सध्याचे आपले पुढारी नजरेसमोर येऊन हताश व्हायला होतं!
रोहणा पुढच्या पोस्टस ची वाट पहातेय...
ReplyDeleteअनघा +१
असा कारभार करणारा नेता असावा. खरचं एकछत्री अंमल असल्याचा हा एक फायदा आहे. उगीच हजार नेते आणि त्यांची आपापसातली स्पर्धा त्यात राज्याची अधोगतीच.
ReplyDeleteThanks for very informative article.
ReplyDeleteFew days back I read one article in Sakal about the Wall in Sea under water, near one Jaldurg (I forgot the name). It was very confidential as it was part of the war strategy, so no one had exact info about it. But fortunately it came in picture few days back. Can you please post it if you found more info about it.
तू नक्कीच विजयदुर्ग बद्दल वाचले असशील. पाण्याखालची भिंत ही विजयदुर्गची खासियत.. :)
ReplyDelete