Tuesday, 5 January 2010

५ जानेवारी १६६४ - सुरतेवरील पहिली स्वारी ... !

५ जानेवारी १६६४, मंगळवार -

शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."

सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.

मराठा फ़ौज सूरतेमध्ये घुसली आणि सूरत बेसुरत केली गेली. इंग्रज, पोर्तुगीझ आपआपल्या वखारीचे रक्षण करण्यासाठी सज्ज होउन बसले होते. तर दुसरीकडे किल्लेदार इनायतखान सूरतेच्या किल्ल्यात दडून बसला होता आणि मुघल फौजेची वाट बघत होता. मराठ्यान्नी पूर्ण ४ दिवस सूरतेमध्ये लुट केली.
.
.

2 comments:

  1. वर सांगितल्या प्रमाणे महाराजानी इनयाताखाना कड़े खंडणीची मागणी केली होती... जी त्याने धुडकावून लावली.. व महाराजानी सुरते वर हल्ला केला.. वास्तविक सूरत हल्ल्या प्रसंगिची १ विचित्र गोष्ट मी आपल्यास सांगू इच्हितो.. हल्ल्यानंतर.. इनयाताखानाने किल्ल्यात्ल्या १ तरुण वकिलाला महाराजान्कड़े तहास पाठवले.. त्याने १ विचित्र अट महाराजन घातली की तो जे कही बोलेल ते महाराजांच्या कानातच बोलेल.. असे म्हणून तो महाराजांच्या जवळ गेला.. अणि त्याने महाराजन च्या अंगावर धारदार शास्त्राने हाला करणार तेव्हढ्यात एका शुर मराठ्याने त्याचा हातच कापला.. अश्या प्रकारे झालेली विचित्र घटना पाहून मावले संतापले अणि त्यानी कैद्यांची कत्तल करण्यास सुरवात केली.. कैद्यांचे हात कापले गेले.. पुढे जाउन हा प्रसंग शांत झाला.. त्या बहादुर मराठ्याचे नाव सध्या मला माहित नाही ज्याने महाराजांचे अमूल्य प्राण वाचवले.. परन्तु लवकरच मी ते आपल्याला देईन तसेच त्या दिवसाची तारिखही देईन ... जेने करुन आपण ते आपल्या ब्लॉग मध्ये टाकाल...
    - निनाद गायकवाड

    ReplyDelete
  2. होय निनाद बरोबर बोललास. हा प्रसंग मला ठावूक आहे. पण नाव मलाही माहीत नाही.. ते कळवल्यास उत्तमच.

    ReplyDelete