२६ जानेवारी १६६२ - लोहगड - विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजेच्या चढाया.
१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची खुप जीवित व वित्तहानी होत असे. कुठलेच किल्ले हातात येत नाहीत हे पाहून त्याने माणसे व गावे लुटायला सुरवात केली होती.
परंतु आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या शिवरायांनी आपल्या अधिकारयान्ना 'गावचा गाव हिंडून रातीचा दिवस करून तमाम रयेती लोकास घाटाखाली बांका जागा असेल तेथे पाठवणे' असे स्पष्ट बजावले होते.
No comments:
Post a Comment