स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' (येथे पत्र क्र. २ पहा) ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली होती.
"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनो शिवस्यैशा मुद्राभद्राय राजते"
मला तर वाटतं "चौरंग" सारख्या शिक्षा पुन्हा सुरु केल्या पाहिजेत. आणि रुचिका प्रकरणातल्या त्या पोलीस महानिरीक्षकापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी.
ReplyDeleteहोय रे हेरंब ... पण शिवरायांसारखे शासक सुद्धा हवेत की.. एकवेळ शिक्षा सुरू होइल पण असा 'जाणता राजा' नाय व्हायचा कधी पुन्हा...
ReplyDelete