१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभूराजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. त्या गोष्टीला आज बरोबर ३२१ वर्षे पूर्ण होत आहेत.
घोरपडे खरंतरं पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण छत्रपति शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेवर असताना गोवळकोंडा येथून त्यांनी म्हालोजी घोरपडे यांना लिहिलेले पत्र 'येथे' वाचू शकता... पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत झाले. संताजी-धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.
अजून एक योगायोग म्हणजे माझा ब्लॉगमित्र सचिन उर्फ़ साळसूद पाचोळा याने २ दिवसांपुर्वीच त्या प्रसंगावर एक अप्रतिम ब्लॉगपोस्ट लिहिला तो ही आवर्जुन वाचाच.
मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता... .... पूर्ण वाचा ...
रोहनजी,
ReplyDeleteदेहभान विसरून वेडं होवून मृत्युकडे बिनदिक्तपणे ते सातजण का दोडले?
गात्रं थकली होती तरी छातीचा कोट करून फक्त त्या तीन ललकाऱ्या एकू येइंपर्यंत बाजीनं का खिंड लढवली?
दिलेर कडून सरदारकी मिळत असतानाही मुरारबाजीनं का स्वतच्या रक्ताचा ओघ सांडवला?
का तान्या पोरांच लगीन सोडून सिहंगडावर मरायला स्वार झाला? का?... असे कैक वीर आहेत... की ज्यांना आम्ही विसरलोय, त्यांच्या बलिदानालाही विसरलोय...
आम्च्या सारखे क्षुद्र स्वार्थी फक्त इतिहास वाचतो... समजून घेत नाहि, अंगी बाणवत नाहि?
रोहन, इतिहासातला फार दुर्दैवी दिवस रे हा !! संभाजी आणि छावा मधली अखेरची वर्णनं वाचवत नाहीत रे :-(
ReplyDeleteहेरंब खरय रे अजिबात वाचवत नाहीत शेवटची काही पानं छावाची.....डोळे ओघळत असतात एकीकडे मनात फितूरांविरूद्ध चिड दाटते.....
ReplyDeleteरोहन तूला काय वेगळे सांगावे.....ईतिहासाशी जोडून ठेवतोयेस सगळ्यांना......