Sunday, 31 May 2009

३१ मे १६७४



३१ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ७ दिवस आधी प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई यांच्याशी प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला.


३१ मे १७२५ - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.

Saturday, 30 May 2009

३० मे १६७४



३० मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी 'विनायक शांती विधी' संपन्न.

Friday, 29 May 2009

२९ मे १६७४


२९ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.

Wednesday, 27 May 2009

२८ मे १६६४


२८ मे १६६४ - सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता.

***५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.***
************************************************************************************


२८ मे १६७४ - शिवाजी महाराज यांची राजाभिषेकाच्या 10 दिवस आधी मुंज करण्यात आली.
************************************************************************************


२८ मे १७०१ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.

***औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.***

Tuesday, 26 May 2009

२७ मे १७०२



२७ मे १७०२ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.




२७ मे १८२५ - डॉ. बरनाडी पेरेस डिसिल्वा या गोमंतकाला पोर्तुगीझांनी गवर्नर बनवले. याने तेरेखोलच्या किल्ल्यामधून पोर्तुगीज सत्तेविरुद्धच उठाव केला. पण हा उठाव टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड हत्याकांड करून तो पोर्तुगीझांनी दाबला.

***********************************************************************************

Monday, 25 May 2009

२६ मे १७३३


२६ मे १७३३ - पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले.

पत्रात ते म्हणतात,"सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजन वेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे. सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."

Sunday, 24 May 2009

२५ मे १६६६



२५ मे १६६६ - शिवाजी राजांची आग्रायेथील नजर कैद सुरु. आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला.



१२ मे १६६६ रोजी शिवाजीराजे हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब यांस त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त भेटले होते.

Friday, 22 May 2009

२३ मे १७२९


२३ मे १७२९ - पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश याचा दारूण पराभव केला.

महम्मदखान बंगश मोठे सैन्य घेउन बुंदेलखंडावर चाल करून आला तेंव्हा राजा छत्रसाल याने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकड़े मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,"जो गति ग्राह गजेन्द्र की सो गत भई है आज ... बाजी जात बुलेंदकी राखो बाजी लाज"


आपल्या २५ हजार घोड़दळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून गेला. त्यानी आधी बंगशची पूर्ण रसद तोडली आणि त्याला मुघल बादशाह कडून कुठलीच मदत मिळू दिली नाही. जयपुरकडून बंगशचा मुलगा कैमखान बापाच्या मदतीस धावला पण बाजीरावने त्याचा जयपुरजवळ पूर्ण पराभव केला. आता बंगशने पूर्ण शरणागती पत्करली आणि 'राजा छत्रसाल' वर पुन्हा हल्ला करणार नाही असे कबूल करून आपली सुटका करून घेतली. राजा छत्रसालने बाजीरावला केलेल्या मदतीबद्दल त्याचा काल्पी, झांसी, सागर, सिरोंज, हरदेनगर हा वार्षिक महसूल ३३ लाख उत्पन्नाचा भाग बाजीरावास बहाल केला.

२३ मे १७३७ - पोर्तुगीझांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुनश्च बांधून घेतला.

Wednesday, 20 May 2009

२१ मे १६७४


२१ मे १६७४ - शिवाजी महाराज प्रतापगडाहून रायगडास निघाले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.

२० मे १६६५

२० मे १६६५ - राजगडाहून शिवाजी महाराजांनी आपले वकिल रघुनाथपंत 'पंडितराव' यांस मिर्झाराजा जयसिंह यांच्याकडे पुरंदर तहासंदर्भात बोलणी करण्याकरिता रवाना केले.

Monday, 18 May 2009

१९ मे १६७४


१९ मे १६७४ - शिवाजी महाराजांनी राजाभिषेकाच्या आधी प्रतापगडावरील भवानी मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.

Friday, 15 May 2009

१६ मे १६४९


१६ मे १६४९ - विजापुरच्या आदिलशहा कडून शहाजीराजांची सुटका झाली.


शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती.


ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

Thursday, 14 May 2009

१५ मे १७३१



१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

Wednesday, 13 May 2009

१४ मे १६५७

१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी)

त्यांच्या ३५२ व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा आणि अभिवादन ... !


Tuesday, 12 May 2009

१३ मे १८१८


१३ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.

Monday, 11 May 2009

१२ मे १६६६

१२ मे १६६६ - शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते.


हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची ही पाहिली आणि अखेरची अशी एतिहासिक भेट.


पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.


Sunday, 10 May 2009

११ मे १७३९

११ मे १७३९ - मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले.

४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

Saturday, 9 May 2009

१० मे १८१८


१० मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात प्रचंड तोफांचा मारा करून मेजर प्रोथेरने रायगड किल्ला उध्वस्त केला.


४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

Thursday, 7 May 2009

९ मे १६६०



९ मे १६६० - शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला.

शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.

Tuesday, 5 May 2009

६ मे १६५६

६ मे १६५६ - रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.

रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

Monday, 4 May 2009

५ मे १६६३


५ मे १६६३ - गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.



१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

Sunday, 3 May 2009

४ मे १७३९



४ मे १७३९ - वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले,"किल्ला जिंकता येत नाही तर किमान माझे मुंडके तोफेने उडवून किल्ल्यात जाउन पडेल असे तरी करा."


ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.

Saturday, 2 May 2009

३ मे १८१८

३ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.

१ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.

Friday, 1 May 2009

१ मे १९६०


१ मे १९६० - महाराष्ट्र दिन.

१ मे २००९ पासून सुरू होणारे वर्ष हे महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

***** संयुक्त महाराष्ट्रचे गीत ... !

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! धृ

फिरंग्यास गोव्याच्या चारूनी खडे ... माय मराठी बोली चालली पुढे ... !
एकभाषिकांची हो येथ संगती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! १

सह्य पठारीच्या तेजस्वी रणकथा ... रंगती शाहीर मुखे अजुनी एकता ... !
इतिहासी एक मिळे स्फूर्ति अन् गती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! २

कोकणच्या दुःखाची तरल स्पंदने ... नागपूरी जनतेची हलविती मने ... !
माय एक धरणीला जेथ मानती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ३

शेतकरी जमिनीचा एथल्या धनी ... कामगार जनतेचा येथ अग्रणी ... !
श्रमजीवी सत्तेची जेथ शाश्वती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ४

भिन्न धर्म जातीची सर्व बंधने ... तोडुनिया एकजीव जाहली मने ... !
लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ५

कवि – कै. डॉ. सुधीर फडके ...
मूळ गायक – शाहिर अमर शेख ...

१ मे १६६५


१ मे १६६५ - पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले. दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.

१ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.