Sunday, 3 May 2009

४ मे १७३९४ मे १७३९ - वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले,"किल्ला जिंकता येत नाही तर किमान माझे मुंडके तोफेने उडवून किल्ल्यात जाउन पडेल असे तरी करा."


ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.

1 comment:

  1. ही आख्यायिका आहे. वसईच्या मोहिमेबद्दल अतिशय विस्तृत व माहितीपूर्ण असे पुस्तक श्री. य. न. केळकर यांनी खूप वर्षांपूर्वी लिहिले आहे. त्यांत असा काही उलेख वाचावयास मिळत नाही. अशा तर्‍हेच्या ऐतिहासिक माहितीच्या ब्लॉगवर आख्यायिकांना स्थान देऊं नये.
    मराठ्यांनी चालवलेले सुरुंग १मे ला किल्ल्याच्या तटाखाली पोचले व त्यांचा स्फोट झाला. पुढे तीन दिवस संग्राम चालून नाइलाजाने पोर्तुगीजांनी ४ मे ला किल्ल्यात पांढरे निशाण लावले अशी हकीगत केळकरांनी दिली आहे.

    ReplyDelete