Tuesday, 12 January 2010

१२ जानेवारी १५९८

१२ जानेवारी १५९८ - राजमाता जिजाऊ यांची जयंती. वडिल लखुजीराव जाधव आणि आई महालसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाउंचे 'राजा शहाजी भोसले' यांच्याशी लग्न झाले.(फोटो नेटवरुन साभार)

वडिल निजामशाही मध्ये तर नवरा आदिलशाही मध्ये चाकरी करत असताना मात्र मासाहेबांनी स्वतंत्र स्वराज्याची आस धरली होती. (शहाजी राजांच्या साथीने) ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याचे 'छत्रपति शिवराय' आणि 'छत्रपति शंभूराजे' असे २ छत्रपति घडवले.

अश्या थोर राष्ट्रमातेस मानाचा त्रिवार मुजरा ... !!!

1 comment:

  1. महाराष्टचा स्वाभिमान जागवणाऱ्या जीजामातेस आमचाही मानाचा मुजरा...

    ReplyDelete