Friday, 14 January 2011

मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

खरेतर अधिक काही लिहावे असा मानस होता पण इतरांनी इतकी
विस्तृत लिहिले आहे त्यावर अजून तेच कशाला असाही एक विचार आला. गेल्या काही दिवसात पानिपत विषयावर वाचलेली काही चांगली माहिती -
 

१. लोकसत्ता मधील मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे यांचा उत्कृष्ट लेख - ह्यात इतिहासच नाही तर लढाईचे युद्ध शास्त्रीयरित्या विश्लेषण केलेले आहे.
२. सुहासची पोस्ट.
३. देवेंद्रची पोस्ट.

२००३ साली मी जेंव्हा विश्वास पाटीलांचे पुस्तक वाचायला घेतले तेंव्हा मला पानिपत ह्या विषयावर विस्तृत माहिती अजिबात नव्हती. दररोज सकाळी ठाणे ते दादर आणि संध्याकाळी दादर ते ठाणे असा ट्रेन प्रवास करताना मी पानिपत वाचायचो. आजूबाजूचा कोलाहल, गर्दीगोंगाट अजिबात कानी यायचा नाही. अगदी भारावल्यागत वाचत सुटायचो. अनेक महिने एकच सीटवरून प्रवास केल्याने आजूबाजूचे ओळखीचे झालेले सुद्धा विचारायचे. कुठे पोचले मराठे? आता पुढे काय होतंय? इतकी उत्सुकता.. जणू काही आत्ताच ते तिथे घडतंय!!! मग आदल्या दिवशी वाचलेले थोडक्यात मी सर्वांना सांगायचो. मग इतिहासावर चर्चा सुरू व्हायच्या.
मला लोकांना इतिहास सांगायची सवय बहुदा तिथूनच सुरू झाली असावी. अक्षरशः काही दिवसात मी ते पुस्तक मी वाचून काढले. नंतर लक्ष्यात आले की इतिहासाच्या नोंदी घ्यायला हव्यात. पण ते ट्रेनमध्ये शक्य नव्हते. जेंव्हा नोकरी सोडली तेंव्हा वर्षभर घरी बसून होतो. पुन्हा एकदा पानिपत सविस्तर वाचून काढले. एक आख्खी डायरी भरून नोंदी काढल्या. अमुल्य  माहिती नीट जपून ठेवली.
आता मला खुद्द पानिपतला भेट द्यायची आहे. माझे एक स्नेही, आज निनाद बेडेकर यांच्यासोबत तिथे गलेले आहेत. तिथला वृतांत हाती आला की देईनच... :)


 
पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहीत... करेंगे या मरेंगे... ह्या घोषणेपेक्षा.. 'बचेंगे तो और भी लढेंगे' ही दत्ताजी शिंदे यांची बोली खुद्द महाराजांकडून आली होती. हा स्वराज्याचा मूलमंत्र होता...

एक मराठी म्हणून मला प्रचंड अभिमान आहे की आम्ही देशासाठी एक खूप मोठे बलिदान दिलेले आहे. त्याचे स्मरण आम्हास कायम रहो हीच इच्छा... :)


जाता जाता तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... त्या वीरांची आठवण ठेवतच स
साजरा करा..

12 comments:

  1. मी पण बरीचशी पुस्तके अशी वाचून काढली आहेत. पालघर ते दादर ,दादर ते पालघर
    आणी मला तिन वेळा पानीपत ला जून सुद्धा रणभूमीला जाता आले नाही :-(

    ReplyDelete
  2. मला वाटतं कि इतिहासातील अभिमानाचे संदर्भ, आपण जर सद्य परिस्थितीशी जोडले तर आजचा लढा आपण अधिक इर्षेने देऊ शकू. त्यामुळे हे उजाळा देण्याचं काम चांगलेच आणि मोठेच आहे. खारीचा वाटा. काय वाटतं तुला?

    ReplyDelete
  3. अनूजा... आपण जाऊया एकदा नक्की.. :)

    अनघा.. 'इतिहास हा भुतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो' हे माझे स्पष्ट मत आहे. तेंव्हा आपला वाटा खारीचा नाही तर अजून जास्त आहे आता... :) ती जबाबदारी पार पडायला हवीच की... :)

    ReplyDelete
  4. पानिपतकडे मी देखील नेहमी पराभव म्हणूनच पहात आलो. ही पोस्ट वाचून आज प्रथमच पानिपताची दुसरी बाजू देखील कळली.

    ReplyDelete
  5. पानिपत म्हणजे हार...असच आज पर्यंत जनसामान्यात रुजवल गेल आहे...सामान्य माणुस बोली भाषेत काही वाइट झाल किंवा उध्वस्त झाल की अगदी सहजतेने म्हणतो "पानिपत" झाल.या संग्रामाची खरी बाजु समजुन घेतली गेली नाहीच.असो हळु हळु जनमानसापर्यंत ही दुसरी पोहचते आहे हे काय कमी नसे....असो सेनापती तुम्हाला मकर संक्रातीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. रोहन
    नेहमीप्रमाणे उत्तम पोस्ट..
    .पानिपतावर मराठा सैन्याने जिंकलेली लढाई भले हरली असेल पण मराठा सैनिकांनी प्रतिकुल परिस्थितीत गाजवलेले असामान्य , अतुलनिय असे शौर्य हे निर्विवाद वाखाणण्याजोगेच आहे....या लढाईनंतर मराठ्यांची दिल्लीच्या तख्तावरची पकड ढिली झाली पण याच पानिपतानंतर पुन्हा हिंदुस्थानाकडे इस्लामी आक्रमणकर्त्यांनी आपली नजर वळवायचे धाडस भविष्यात कधीही केले नाही .सतत ५०० वर्षॅ हिंदुस्थानावर इस्लामी राज्यकर्त्यानी फिरवलेला वरवंटा दुर सारण्यात मराठी सैन्य युद्ध हरले असताना देखिल यशस्वी झाले हेच पानिपताच्या लढाईचे साध्य आहे...छ्त्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी स्वप्नाला मराठ्यांच्या या पानिपताने पुर्णत्वास नेले असे म्हटंल्यास अतिशयोक्ती होणार नाही.. याचे कारण एकच या लढाईने हिंदुस्थानावरचा क्रूर असा इस्लामी बद-अंमल कायमचा दुर झाला ... अब्दालीने परत न जाता जर इथेच आपले बस्तान बसवले असते ?तर आताचे चित्र काय असते याची कल्पना देखिल करवत नाही.....जवळपास एकलाख सैन्य या लढाईत कामी आले....सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्यासारखे धुरंधर धारातिर्थी पडले....कैक मराठा सरदार कामी आले....कैक स्त्रियांची अस्मत लुटली गेली कित्येक बटिक बनवुन पळवल्या गेल्या ......मराठी दिसणार्‍या प्रत्येकाला अब्दालीच्या सैन्याने वेचुन वेचुन कापुन काढले....दत्ताजी शिंदेंसारखे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणारे शुरविर पतन पावले.....इब्राहिम गारद्यासारख्या खाल्यामिठाला जागलेल्यांनी मराठ्यांशी हरामखोरी न करता व आपल्या जातीवर व धर्मावर न जाता आपल्या समोर असलेल्या धर्मबांधवांशी एकदिलाने आणि निकराने लढण्याचे औदार्य दाखवले नि:शस्त्र इब्राहिमला अब क्या करोगे?असे विचारले असता फिरसे उठकर और फौज बांधकर अफगाणिस्थानपे हमला करेंगे "सारखे बाणेदार उत्तर दिले......पानिपताच्या लढाईने भले मराठ्यांना हतबल केले असेल पण या हिंदुस्थानावर हिंदुधर्मावर कैक वर्षे असलेली इस्लामी शासकांची पकड मात्र कायमची दुर केली...
    २५० वर्षांपुर्वी मकरसंक्रातीच्या दिवशी झालेली पानपताची लढाई मराठ्यांनी हरली असे भले इतिहास सांगत असेल पण प्रत्यक्षात मकरसंक्रांतीच्या शुभमुहुर्तावर हिंदुस्थानावर ५०० वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अमानुष इस्लामी राज्यकर्त्यांच्या अहर्निश व निरंकुश असलेल्या सत्तेच्या संक्रातीला कायमचे दुर केले.
    .पानिपताच्या या इतिहासातुन आपण काय शिकु शकतो? जे सद्य परिस्थितीत आपल्या कामी येईल याचा प्रत्येक स्वाभिमानी व देशप्रेमी मराठी माणसाने व इतरांनी देखिल विचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल्.इथुन धडा घेत आपण आपल्या भविष्यकाळात काही बदल करु शकलोच तर आणि तरच ती पानिपतावर पतन पावलेल्या धर्माने हिंदु पण कर्माने मराठी असलेल्या असंख्य योध्यांना खरी खुरी श्रद्धांजली असेल..

    ReplyDelete
  7. रोहन नक्की जाऊया रे !

    ReplyDelete
  8. पानिपतचा मराठ्यांचा तथाकथित पराभव तांत्रिक होता असे नंतरच्या घटनांवरून वाटते. अब्दालीला हिंदुस्तानवर पुन्हा हल्ला करण्याची हिंमत झाली नाही आणि मराठ्यांचा दरारा पानिपतानंतरही कायम राहिला या वस्तुस्थितीवरून असे दिसते.

    ReplyDelete
  9. खरंच.. अशा प्रकारची माहिती जास्तीत जस्त लोकांपर्यंत पोचून पानिपतची नकारार्थी प्रतिमा बदलली गेली पाहिजे !!

    ReplyDelete
  10. panipat mhanje tahanlelya sinhala sappadlele vaalwant

    ReplyDelete
  11. पाकिस्तानात झाहिद हमीद नावाचा एक व्रात्य व कट्टर जिहादी स्वयंघोषित विद्वान आहे. इथले तिथले वाचून कुराणाचा दाखला देऊन तो पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत भारताविरुद्ध गरळ ओकत असतो.
    त्याने पानिपत वर एक कार्यक्रम केला.तो चक्क पानिपत ह्या पुस्तकाच्या माहितीवर आधारीत होता. अर्थात त्याने कार्यक्रमाला कलाटणी देत असे भासविले कि जिंकण्याची शक्यता धूसर झाली असतांना केवळ अल्ला ,ताला ने अब्दाली ला साथ दिली , आणि मराठ्यांनी चुका करून हातातील लढाई गमावली ,मात्र त्याने शेवटी हेही जरूर सांगितले
    की मराठ्यांनी त्यांनी गमावलेला त्यांचा काही वर्षात प्रांत परत मिळवला.
    ह्या दरम्यान अब्दाली ह्यांची एक तोफ लाहोर शहरात आहे ती पाहण्यात मिळाली.
    अजून एक माहिती अशी कळली
    मराठ्यांकडे फ्रेंच बनावटीच्या त्याकाळातील भारतातील सर्वोत्तम तोफा होत्या.
    आणि ते चालविण्यासाठी कुशल कारागीर ह्या उलट अब्दाली कडील तोफखाना अगदीच मागासलेला होता.
    तरीही आपण जिंकलो कारण अल्लाची कृपा
    एवढ्या कट्टर माणसाकडून सुद्धा मराठ्यांच्या शौर्या बद्दल कौतुक पाकिस्तानी टीव्ही वर केले गेले.

    ReplyDelete