Thursday, 31 December 2009
३१ डिसेंबर १८०२
३१ डिसेंबर १८०२ - पेशवा बाजीराव दुसरा आणि इंग्रज यांच्यात तह. या तहानुसार मराठ्यांचा बराचसा भूभाग इंग्रजांच्या अंमलाखाली गेला.
Friday, 11 December 2009
८ डिसेंबर १७४०
८ डिसेंबर १७४० - रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. 'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला.
Thursday, 3 December 2009
३ डिसेंबर १६६९
३ डिसेंबर १६६९ - संभाजीराजांच्या वतीने सरसेनापती प्रतापराव गुजर, आनंदराव आणि निराजी रावजी हे २५०० फौजेसह शहजादा मुअज्जमकडे औरंगाबादेस होते. 'त्यांना अटक करा' अशी खबर औरंगजेबाने मुअज्जमला फर्मानाद्वारे सोडली. फर्मान पोहोचण्याआधीच ही खबर मुअज्जमला कळली व त्याने या सर्व सरदारांना फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण वाचले.
औरंगजेबाने बनारस येथे देवळे तोडत मुघल आणि मराठे यांच्या मधला तह सुद्धा मोडला. मुघल आणि मराठे यांच्यामधल्या युद्धाला सुरवात झाली जे ३७ वर्षे चालले (१६७०-१७०७) आणि संपले ते औरंगजेबाच्या मृत्युनेच. मराठ्यांना संपवायला निघालेला बादशाह दख्खनच्या मातीतच कायमचा दफ़न झाला.

Subscribe to:
Posts (Atom)