३ डिसेंबर १६६९ - संभाजीराजांच्या वतीने सरसेनापती प्रतापराव गुजर, आनंदराव आणि निराजी रावजी हे २५०० फौजेसह शहजादा मुअज्जमकडे औरंगाबादेस होते. 'त्यांना अटक करा' अशी खबर औरंगजेबाने मुअज्जमला फर्मानाद्वारे सोडली. फर्मान पोहोचण्याआधीच ही खबर मुअज्जमला कळली व त्याने या सर्व सरदारांना फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण वाचले.
औरंगजेबाने बनारस येथे देवळे तोडत मुघल आणि मराठे यांच्या मधला तह सुद्धा मोडला. मुघल आणि मराठे यांच्यामधल्या युद्धाला सुरवात झाली जे ३७ वर्षे चालले (१६७०-१७०७) आणि संपले ते औरंगजेबाच्या मृत्युनेच. मराठ्यांना संपवायला निघालेला बादशाह दख्खनच्या मातीतच कायमचा दफ़न झाला.
वर उलेख केल्या प्रमाने मुअज्जम हा बादशाह चा मुलगा होता... त्याला औरंगजेबाने दक्खन ची सुभेदारी दिली होती..याच्या बद्दल जर आपण अधिक जाणून घेतले तर आपण थक्क व्हाल..!! या युवराजना फ़क्त एकच काम येत होते.. ते म्हणजे मौजमस्ती मजा.. ऐश शिकारी... वास्तविक त्याचे त्याच्या वडिलांचा सगळ्यात मोठा शत्रु ( शिवाजी महाराज ) बरोबर अतिशय मैत्रीचे संबंध होते.. तो शिवाजी महाराजंशी अतिशय चांगल्या स्वभावाने वागायचा...!!! वास्तविक याच्या मागे सुद्धा मोठे राजकारण होते.. ते म्हणजे मोगल शाहित एक जुनी परंपरा आहे ती म्हणजे वडिल जर आजारी पडले किवा वयोवृद्ध झाले तर त्याच्या वरासानमध्ये आपल्या वडिलांची गादी मिलावन्याचा प्रयन्त होत असे.. अश्या कामी शिवाजी महाराजन सारखा जर उत्त्तम राजकारणी आपल्या सोबत असेल तर आपण आरामात गादी वर बसु शकतो या धोरण नुसार त्याचे मराठ्यांबरोबर चांगले संबंध होते.. याच कारणास्तव त्याने सरनौबत प्रतापराव गुजरना पलुन जाण्याचा योग्य सल्ला दिला.
ReplyDelete- निनाद गायकवाड