Saturday, 4 July 2009

४ जुलै १७२९

४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.


तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.

१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.

सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य
मुद्री येकम विराजते"

पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...

5 comments:

 1. ह्या प्रणाम शब्दावरून शोध घेतला कारण एखादी चपखल कविता असावी असे वाटले.

  दोन काव्ये सापडली.. ती पुढीलप्रमाणे:

  १.

  मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
  मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

  जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
  रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

  जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
  सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

  काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
  प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

  गीतकार : कुसुमाग्रज
  गायक : लता मंगेशकर

  २.

  मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
  प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

  गीत - गोविंदाग्रज
  संगीत - वसंत देसाई
  गायक - जयवंत कुलकर्णी व इतर


  हे दोन्हीही अग्रज नकळत काहितरी छान लिहीते झालेत की जे एका वेगळ्या अर्थाने कान्होजी आंग्रे यांसी...

  ReplyDelete
 2. मनोहर माळगावकरांची कान्होजी आंग्रे ही कादम्बरी योगायोगाने मी ४ जुलैलाच विकत घेतली आणि वाचू लागलो .. तिच्या मधे ''आंग्रे'' नावाविषयी जरा वेगला खुलासा आहे .. मी नाट्य क्षेत्रात असल्याने या विषयाकडे वेगळ्या नजरेने पाहात आहे .. पण आत्ताच काही सांगता येणार नाही .. तुमचा इतिहास व्यासंग रांगडा दिसतो आहे .. शुभेच्छा !!

  ReplyDelete
 3. खरं तरं ह्यातला बराचसा भाग त्या पुस्तकामधूनचं घेतला आहे मित्रा ... तुमच्या खुलाश्याची वाट बघतो मी .... :

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ... !

  ReplyDelete
 4. Mee tya kaadambareewar kaahee karataa yeil ka, mhanje naatak vagaire .. he paahato aahe ..

  ReplyDelete
 5. कल्पना चांगली आहे. काही ठरले तर मला नक्की कळवा... :)

  ReplyDelete