Friday, 16 October 2009

१६ ऑक्टोबर १६७०

१६ ऑक्टोबर १६७० - मुघल सुभेदार दाउद खानला बाकीखान येउन मिळाला. दुसऱ्यादा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर निघाले होते. शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक ह्या मोघली भागात अडवण्यास सांगितले होते.

सर्वात पुढे असणाऱ्या इखलास खान मियाना याने मात्र दाउदखानाची वाट न बघता मराठ्यांच्या १५ हजाराच्या फौजेवर हल्ला चढवून मोठी घोडचुक केली. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. काही वेळात दाउद खानच्या सोबत असलेल्या बुंदेलेंच्या फौजेने मराठ्यांना काही प्रमाणात रोखले. संपूर्ण दिवसात मराठ्यान्नी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहू बाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैरान करून सोडले. संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटी सकट पुढे सटकले.



2 comments:

  1. छान माहिति आहे.......पण संदर्भ कुठून घेतला?

    ReplyDelete
  2. धन्यवाद विनीत...

    संदर्भ :छत्रपति शिवाजी ... लेखक - सेतु माधवराव पगडी ... NBT प्रकाशित.

    ReplyDelete