२४ ऑक्टोबर १६५७ - शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.
औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.
No comments:
Post a Comment