Monday, 30 March 2009
३१ मार्च १६६५
३१ मार्च १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु.
मिर्झा जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी २९ मार्च येऊन दाखल झाले होते.
३० मार्च १६४५
३० मार्च १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले.
या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.
http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post.html

Friday, 27 March 2009
२७ मार्च १६६७
२७ मार्च १६६७ - शिवरायांना सोडून आधी आदिलशाही आणि मग मुघलांना शामिल झालेल्या नेतोजी पालकरांचे औरंगजेबकडून धर्मांतर. नेतोजी पालकरांचा मुहंमद कुली खान बनवला गेला.
Tuesday, 24 March 2009
२४ मार्च १६७७
२४ मार्च १६७७ - दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम.
भागानगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्र स्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपुर' असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.

Saturday, 21 March 2009
२२ मार्च १७५५
२२ मार्च १७५५ - इंग्रज - पेशवे यांचा तह.
यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.
यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.
Friday, 20 March 2009
२१ मार्च १६८०
२१ मार्च १६८० - शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली.
ह्या नंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.
ह्या नंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.
Wednesday, 18 March 2009
१९ मार्च १६७४
१९ मार्च १६७४ - राजाभिषेका पूर्वी शिवरायांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई वारल्या.
Monday, 16 March 2009
१६ मार्च १६७३
१६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगड येथे पोचले.
अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने ६ मार्च १६७३ रोजी किल्ला जिंकला होता.
Friday, 13 March 2009
१५ मार्च १६८०
१५ मार्च १६८० - शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र 'राजाराम' यांचे प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजेच 'ताराऊ उर्फ़ ताराबाई' हिच्याशी लग्न.
त्यांचे नाव लग्नानंतर बदलून 'सिताबाई' असे ठेवले.
त्यांचे नाव लग्नानंतर बदलून 'सिताबाई' असे ठेवले.
१४ मार्च १६४९
१४ मार्च १६४९ - शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र लिहले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती.
ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
Wednesday, 11 March 2009
११ मार्च १६८९
११ मार्च १६८९ - छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस ... !
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वधु - तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.
१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्या दिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. अखेर शेवटी ११ मार्च १६८९ ला धर्मं आणि राज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.

******************************************************************************
देश धरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था ... ।
महा पराक्रमी परम प्रतापी एक हि शंभू राजा था ... ।
तेजः पुंज तेजस्वी आँखे निकल गयी पर झुका नही ... ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का दिव्य स्वप्न तो मिटा नही ... ।
दोनो पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नही ... ।
हाथ कटे तो क्या हुआ ? सत्कर्म तो छुटा नही ...।
जिव्हा कटी खुन बहाया धर्म से सौदा किया नही ... ।
गर्व से हिन्दू कहने मे कभी किसीसे डरा नही ... ।
राम कृष्ण शालीवाहन के पथ से विचलीत हुवा नही ... ।
शिवाजी काही बेटा था गलत राह पर चला नही ... ।
वर्ष तीनसौ बीत गये शंभू के बलिदान को ... ।
कौन जिता कौन हारा ? पुछ लो संसार को ... ।
कोटी कोटी कंठो मे तेरा आज गौरव गान है ... ।
अमर शंभू तू अमर हो गया तेरी जयजयकार है ... ।
भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढाया था ... !
है दूजा दुनिया मे कोई जैसा शंभू राजा था ?

..... शाहीर योगेश ...
Monday, 9 March 2009
११ मार्च १८१८
११ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला.
४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.
१० मार्च १७०४
१० मार्च १६७३ - रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.
१० मार्च १६७७ - ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.
१० मार्च १७०४ - औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवसाला तोरणा उर्फ़ प्रचंडगड़ जिंकला.

Sunday, 8 March 2009
९ मार्च १६५०
९ मार्च १६५० - तूकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य द्वितीया, शके १५७१, प्रथम प्रहर.
८ मार्च १६७०
८ मार्च १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर-वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला.
ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी अतोनात प्रयत्न केले, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.
Wednesday, 4 March 2009
७ मार्च १६४७
७ मार्च १६४७ - दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
६ मार्च १६७३
६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने किल्ला जिंकला. अन्नाजी दत्तो, गणोजी कावले आणि मोत्याजी खालेकर हे सोबतचे सरदार.
शिवरायांनी पन्हाळ्यावरुन सुटका करून घेतल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला होता. तो राजाभिषेकापूर्वी स्वराज्यात यावा असे शिवरायांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी कोंडाजीला रायग़डी बोलावून मोहिमेआधीच सोन्याचे कड़े बक्षिष म्हणून दिले आणि यशस्वी होउन या असे सांगूनच मोहिमेवर पाठवले.
५ मार्च १६६६
५ मार्च १६६६ - औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
Monday, 2 March 2009
४ मार्च १८१८
४ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ४ मार्चला विसापूरचा किल्ला कर्नल प्रौथरने तोफा डागून उद्धवस्त केला.
आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.
आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.
३ मार्च १६६५
३ मार्च १६६५ - मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंह लाखभर सैन्य घेउन शिवरायांशी लढण्यासाठी पुण्यात येउन दाखल झाला.
3 वर्षात शिवाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. शाहिस्तेखानाची बोटे कापली. सुरत बेसुरत केली आणि त्यावर मोगल सरदारांना पत्र लिहून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळवले होते. आता औरंगजेबाला आपला सर्वात जिगरबाज सरदार दखखनेमध्ये पाठवणे भाग होते.

२ मार्च १८१८
२ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली.
Subscribe to:
Posts (Atom)