Thursday, 31 December 2009
३१ डिसेंबर १८०२
Friday, 11 December 2009
८ डिसेंबर १७४०
Thursday, 3 December 2009
३ डिसेंबर १६६९
औरंगजेबाने बनारस येथे देवळे तोडत मुघल आणि मराठे यांच्या मधला तह सुद्धा मोडला. मुघल आणि मराठे यांच्यामधल्या युद्धाला सुरवात झाली जे ३७ वर्षे चालले (१६७०-१७०७) आणि संपले ते औरंगजेबाच्या मृत्युनेच. मराठ्यांना संपवायला निघालेला बादशाह दख्खनच्या मातीतच कायमचा दफ़न झाला.
Sunday, 29 November 2009
२९ नोव्हेंबर १७२१
आंग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारापुढे इंग्रज आणि पोर्तुगीझ यांच्या संयुक्तफौजांचे सुद्धा काही चालले नाही. ४ दिवसात धूळधाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगिझान्ना पेशवे थोरले बाजीराव यांच्याबरोबर तह करावा लागला.
Saturday, 28 November 2009
२८ नोव्हेंबर १६५९
२८ नोव्हेंबर १६७० - ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी. पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली ज्यामुेळ सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली.
.
.
Wednesday, 25 November 2009
२५ नोव्हेंबर १६८३
Sunday, 22 November 2009
२० नोव्हेंबर १६६६
२० नोव्हेंबर १६७९ - संभाजी राजे दिलेरखानाच्या छावणीतून पळाले आणि त्यांनी पन्हाळा गाठला.
२० नोव्हेंबर १६६५ - पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेतोजी पालकरसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूर स्वारीसाठी रवाना. ही मोहिम पुढे १६ जानेवारी १६६६ पर्यंत सुरू होती.
Tuesday, 10 November 2009
११ नोव्हेंबर १६५९
११ नोव्हेंबर १६७९ - मराठ्यान्नी 'खांदेरी'येथील इंग्रजांविरुद्धचे युद्ध जिंकले. 'डोव्ह' नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी-विदेशी सैनिक कैदी म्हणुन ताब्यात. या युद्धामुळे इंग्रजांना मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य पटले आणि २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.
Monday, 9 November 2009
१० नोव्हेंबर १६५९ - शिवप्रतापदिन.
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
... कविराज भुषण
भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.
अधिक वाचा ... http://shreeshivchatrapati.blogspot.com/2009/02/9-afzalkhan-meet-10th-nov-1659.html
Saturday, 7 November 2009
७ नोव्हेंबर १७६२
Tuesday, 3 November 2009
३ नोव्हेंबर १६८९
२ नोव्हेंबर १७६३
१ नोव्हेंबर १७१८
पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली. 'रामा कामती' नामक मुंबईच्या एका व्यापाऱ्याला फितुरी करून मराठ्यांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन इंग्रजांनी अटक केले. त्यावर खटला चालवून कारावासाची शिक्षा ठोठावली आणि कैदेत घातले. पुढे १० वर्षांनी तो कारावासामध्येच वारला.
Friday, 23 October 2009
२४ ऑक्टोबर १६५७
औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.
२३ ऑक्टोबर १६६२
१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.
संपूर्ण पत्र 'येथे' वाचू शकता ...
Friday, 16 October 2009
१६ ऑक्टोबर १६७०
Monday, 5 October 2009
५ ऑक्टोबर १६७०
शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक येथे अडवण्यास सांगितले. मुघलांची लढाईची पूर्ण तयारी नव्हती. मराठा फौज मात्र लढाईसाठी सज्ज झाली होती.
Saturday, 3 October 2009
३ ऑक्टोबर १६७०
सूरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -
"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे."
ह्या पत्रामध्ये शिवाजी राजांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.
” I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.”
.
.
Thursday, 24 September 2009
२४ सप्टेंबर १६७४
Tuesday, 22 September 2009
२२ सप्टेंबर १६६०
१२ जुलै १६६६० ला पन्हाळावरुन निसटल्यावर शिवरायांना मुघलांशी लढायला वेळ हवा असल्याने आदिलशाहीकडून थोडी स्वस्थता हवी होती. योग्य राजकारण करून राजांनी पन्हाळगड सिद्दी जौहरच्या म्हणजेच आदिलशाहीच्या स्वाधीन केला.
Sunday, 13 September 2009
१३ सप्टेम्बर १७२०
पण १७२० मध्ये एका बाजूला बोलणी तर दूसरीकड़े लढाईची तयारी करत ते 'घेरिया'कड़े निघाले. मात्र आंग्र्यांची लढाईची तयारी बघून ते घेरिया सोडून देवगडावर हल्ला करायला सरकले.
Friday, 11 September 2009
१२ सप्टेम्बर १६६६
१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी राजे व बाळ शंभूराजे पेटार्यासह आग्र्याहून निसटले होते. तर २० ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले होते. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.
Thursday, 10 September 2009
११ सप्टेम्बर १६७९
इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.
Wednesday, 9 September 2009
९ सप्टेम्बर १६७१
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"
Tuesday, 8 September 2009
७ सप्टेम्बर १६७९
७ सप्टेम्बर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.
Friday, 4 September 2009
५ सप्टेम्बर १६५९
४ सप्टेम्बर १६५६
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.
Monday, 24 August 2009
२० ऑगस्ट १६६६
तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
१७ ऑगस्ट १६६६
Also Read -
Visit To Agra – Threat To Life ...
Escape From Agra… The Route ...
१५ ऑगस्ट १६६४
खवासखान बाजी घोडपडेला येउन मिळण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पराभूत केले.
शत्रूला एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा फडशा पाडणे यात राजांचे रणकौशल्य दिसून येते.
१४ ऑगस्ट १६६०
शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्राम दुर्गावर. राजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेद्यात होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.
किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होउन शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.
८ ऑगस्ट १६४८
फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.
Thursday, 6 August 2009
६ ऑगस्ट १६५९
शिवरायांनी १६५७ पासून कल्याण - भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले.
सदर पत्राचा मराठी अनुवाद -
"शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत."
Saturday, 1 August 2009
१ ऑगस्ट १९२०
Thursday, 30 July 2009
३१ जुलै १६५७
Saturday, 25 July 2009
२५ जुलै १६४८
२५ जुलै १६४८ - विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने 'जिंजी'नजीक शहाजी राजांना कैद केले.
पुढे १६ मे १६४९ रोजी विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली.
शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
****************************************************************************************
२५ जुलै १६६६ - औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.
दि. ७ जून १६६६ रोजी शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे मागितलेले परवाने, अखेर आजच्या दिवशी औरंगजेबाने ते परवाने महाराजांना दिले. या परवान्यानूसार शिवाजी राजांना आपल्याबरोबर आलेल्या फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.
Thursday, 23 July 2009
२३ जुलै १८५६
Wednesday, 22 July 2009
२२ जुलै १६७८
जिंजी येथील राजकारण यशस्वी करून आणि जिंजी ताब्यात घेउन छत्रपति शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखील झाले होते. किल्ल्याला वेढा घालून सुद्धा किल्ला सहजा-सहजी हातात येणार नाही आणि ह्यात वेळ बराच जाणार आहे असे समजल्यावर त्यांनी रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांच्यावर ही कामगिरी सोपवली. पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने खोल खंदक असून सुद्धा हा किल्ला मराठ्यान्नी जिंकला.
Monday, 20 July 2009
२० जुलै १७६१
पानीपतच्या युध्हानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवराव यांनाच पेशवेपद मिळाले.
खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यास वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवे माधवराव सज्ज झाले होते.
Wednesday, 15 July 2009
१५ जुलै १६७४
१६७४ मध्ये राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत. मात्र डाव वेगळाच होता. ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा जे समजले त्यावेळी ते मागे फिरले मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला.
Sunday, 12 July 2009
१२ जुलै १९०८
१२ जुलै १९०८ - लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली, या घटनेला १२ जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण.
यावेळी मुंबईच्या जनतेने सहा दिवस प्रक्षुब्ध होऊन हरताळ पाळला. मुंबई हायकोर्टात दोन आठवडे चाललेल्या लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याचा निकाल त्यादिवशी रात्री दहा वाजता न्या. दावरनी देऊन लोकमान्यांना सहा वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची जबर शिक्षा ठोठावली.
Friday, 10 July 2009
११ जुलै १६५९

Wednesday, 8 July 2009
८ जुलै १९१०
संदर्भ ... डॉ. सच्चिदानन्द शेवडे .. लोकसत्ता विशेष ... !!!
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली, त्या घटनेस ८ जुलै २००९ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. समस्त भारतीयांना अभियान वाटावा असे इतिहासातील हे सोनेरी पान.
१ जुलै १९१० ला त्यांना ‘मोरिया’ बोटीवर चढविण्यात आले. ती ७ जुलैला मार्सेल्सला आली. शौचकुपातल्या पोर्टहोलचे माप त्यांनी जानव्याने घेतले. खिडकीचा व्यास १२ इंच होता. सावरकरांच्या छातीचा घेर ३२ इंच होता. सर्व पाहाणी करून झाल्यावर ८ जुलैच्या सकाळी त्यांनी शौचाला जाण्याचा बहाणा केला. आत जाताच अंगातला गाऊन काढून काचेच्या दारावर पसरून अडकवला. एका झेपेत कमोडवरील पोर्टहोल गाठले. कसेबसे शरीर त्यातून बाहेर काढले. त्याचवेळी संडासाचे दार फोडून शिपाई आत घुसले. सोलवटल्या शरीराने सागरात उडी घेतली. गँगवेवर उभ्या असलेल्या क्वार्टर मास्टरने हे दृष्य पाहून आरडाओरडा केला. अटकेतून सुटका करून घेण्यासाठी अपरिचित समुद्रात उडी घेणे हे लोकविलक्षण साहस होते. समोरचा धक्का हा नऊ फूट उंच होता. त्यावरील शेवाळामुळे ते एक दोनदा पाण्यात पडले. तरीही नेटाने तो धक्का चढून गेले. तेथे कोणी सहकारी दिसत नाहीत हे पाहून ते धावू लागले. काही अंतरावर एक फ्रेंच पोलीस त्यांना दिसला. त्याला ते म्हणाले, Take me into your Custody. Assist me. Take me before a magistrate! त्याला इंग्रजी येत नव्हते नि त्यांना फ्रेंच येत नव्हते. तोवर तेथे येऊन पोचलेल्या शिपायांनी त्या पोलिसाची मूठ गरम केली आणि सावरकरांना ताब्यात घेतले.
हे प्रकरण दाबायचा प्रयत्न इंग्रजांनी केला, पण कामाबाईंमुळे ‘ल ताँ’ या फ्रेंच वृत्तपत्रात ९ जुलै आणि डेली मेलच्या ११ जुलैच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले. आता सावरकरांसाठी ‘इनर केबिन’ निवडण्यात आली. चोवीस तास लक्ष ठेवण्यात येऊ लागले. डेकवर हिंडताना दोन रक्षक त्यांचे हात पकडून फिरत असत. केबिनमधील दिवे चालू असत. त्यांच्या तोंडावर प्रकाश पडेल अशी योजना करण्यात आली. त्यामुळे स्वस्थ झोप घेणे दुरापास्त झाले. या स्थितीतही त्यांना काव्य सुचले..
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला।
जिंकिल रिपु कवण असा जगति जन्मला।।
यानंतर मोरिया बोट एडनला आली. तिथे सशस्त्र शिपायांच्या गराडय़ात सावरकरांना उतरविण्यात आले व सालसेट नामक बाष्पनौकेवर चढविण्यात आले. २२ जुलैला ही नौका कडेकोट बंदोबस्तात मुंबईला पोचली. आचार्य अत्रे त्यावेळचे वर्णन करताना म्हणतात, ‘ज्यावेळी आमचा हा पुरुषसिंह इंग्रज सरकारने तुरुंगात नेऊन कोंबला, तेव्हा त्याचा आवेश आणि डरकाळ्या ऐकून मी मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरत असे.’ वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे फ्रान्स सरकारवर दडपण आले. सरकारने आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार हक्काचा प्रश्न काढला. यावर उत्तर देण्यासाठी इंग्रज राजधुरिणांची तारांबळ उडाली. डेली मेलसारख्या ब्रिटिश वृत्तपत्रांनी देखील सरकारला धारेवर धरले. बॅ. बॅप्टिस्टा हे सावरकरांचे वकील होते. त्यांनी सावरकरांबरोबर चर्चा करून मार्सेल्सचा वृत्तान्त नीट लिहून काढला व पॅरिसमधील मित्रांकडे धाडला. ल ह्यूमनाईट व ल ताँ या वृत्तपत्रांनी या आधारे लेख लिहिले. डेली न्यूजने लंडनमधे तेच केले. या सर्वांना उत्तर देणे इंग्रज सरकारला कठीण झाले.
अखेर हेग येथील आंतरराष्ट्रीय निवाडा न्यायमंडळापुढे हे प्रकरण जावे, असे फ्रेंच सरकारने सुचवले. ब्रिटनने ते मान्य केले, पण त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अभियोग स्थगित ठेवण्याची मागणी मात्र फेटाळली. सावरकरांना फ्रेंच सरकारच्या स्वाधीन करायला हवे की नको, एवढय़ासाठीच हा सर्व घोळ घालण्यात आला. हा निवाडा होण्यापूर्वी ३० जानेवारी १९११ ला सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली.
हेग येथील सुनावणी 'In Camera' झाली व त्यांनी इंग्लंडची बाजू योग्य ठरवली. यामुळे टीकेचे मोहोळ उठले व फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एकूण या एका कृतीमुळे सावरकरांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले एवढे खरे!
Tuesday, 7 July 2009
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमा ...


सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ
दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २
पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३
"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अनुभव असाच एक अविस्मरणीय असा आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला.
Monday, 6 July 2009
६ जुलै १७३५
Saturday, 4 July 2009
४ जुलै १७२९
४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.
तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.
सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य
मुद्री येकम विराजते"
पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...
Wednesday, 1 July 2009
१ जुलै १६९३
Wednesday, 17 June 2009
१८ जून १६६५
Tuesday, 16 June 2009
१७ जून १६७४
१७ जून १६७४ - राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी.
मराठा साम्राज्याचे २ छत्रपति निर्माण करण्याऱ्या या राष्ट्रमातेला कोटि कोटि प्रणाम...!!!
१७ जून १६३३ - अस्त होणाऱ्या निजामशाहीला नवसंजीवनी देण्याचे राजे शहाजी आणि मुरार जगदेवाचे अखेरचे प्रयत्न. ६ वर्षाच्या 'मुर्तिझा'ला गादीवर बसवून निजामशाही चालवण्याचे प्रयत्न.
१६ जून १६५९
१६ जून १६५९ - विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी राजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकरर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदरांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येउन मिळण्यास सांगितले.
१६ जून १६७० - माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली - भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.
Monday, 15 June 2009
१५ जून १६७०
१५ जून १६७५ - कारवारची मोहिम आटोपून छत्रपति शिवाजी महाराज रायगडावर परतले.
Sunday, 14 June 2009
१४ जून १७०४
Saturday, 13 June 2009
१३ जून १६६५
१३ जून १७०० - औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.
Friday, 12 June 2009
१२ जून १७३२
Thursday, 11 June 2009
११ जून १६७४
११ जून १६७४ - छत्रपति शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ओक्सेद्रनला भेटण्याची परवानगी दिली.
Wednesday, 10 June 2009
१० जून १६७६
१० जून १६७६ - छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात.
राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.
१० जून १६८१ - औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.
१० जून १७६८ - पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.
Tuesday, 9 June 2009
९ जून १६९६
९ जून १७०० - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
९ जून १७१८ - पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.
Monday, 8 June 2009
८ जून १६७०
८ जून १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुनश्च जिंकून घेतला.
८ जून १७०७ - औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
८ जून १७१३ - पंत प्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.
Friday, 5 June 2009
५ जून २००९
५ जून २००९ - जेष्ठ शुध्द त्रयोदशी शके १५९६ (ह्या वर्षी तिथीप्रमाणे दिनांक ५ जून) म्हणजेच शिवराजाभिषेक दिन. हिन्दू साम्राज्य दिनोत्सव.
Monday, 1 June 2009
१ जून १९९८
१ जून १९९८ - दुर्गमहर्षी 'गोपाळ निलकंठ दांडेकर' यांची पुण्यतिथी. हा दिवस 'दुर्गदिन' म्हणून साजरा केला जातो.
Sunday, 31 May 2009
३१ मे १६७४
३१ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ७ दिवस आधी प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई यांच्याशी प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला.
३१ मे १७२५ - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.
Saturday, 30 May 2009
३० मे १६७४
३० मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी 'विनायक शांती विधी' संपन्न.
Friday, 29 May 2009
२९ मे १६७४
२९ मे १६७४ - शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.
Wednesday, 27 May 2009
२८ मे १६६४
२८ मे १६६४ - सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता.
************************************************************************************
२८ मे १६७४ - शिवाजी महाराज यांची राजाभिषेकाच्या 10 दिवस आधी मुंज करण्यात आली.
२८ मे १७०१ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.
***औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.***
Tuesday, 26 May 2009
२७ मे १७०२
२७ मे १७०२ - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.
२७ मे १८२५ - डॉ. बरनाडी पेरेस डिसिल्वा या गोमंतकाला पोर्तुगीझांनी गवर्नर बनवले. याने तेरेखोलच्या किल्ल्यामधून पोर्तुगीज सत्तेविरुद्धच उठाव केला. पण हा उठाव टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड हत्याकांड करून तो पोर्तुगीझांनी दाबला.
***********************************************************************************
Monday, 25 May 2009
२६ मे १७३३
२६ मे १७३३ - पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले.
पत्रात ते म्हणतात,"सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजन वेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे. सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."
Sunday, 24 May 2009
२५ मे १६६६
२५ मे १६६६ - शिवाजी राजांची आग्रायेथील नजर कैद सुरु. आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला.
१२ मे १६६६ रोजी शिवाजीराजे हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब यांस त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त भेटले होते.
Friday, 22 May 2009
२३ मे १७२९
२३ मे १७२९ - पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश याचा दारूण पराभव केला.
महम्मदखान बंगश मोठे सैन्य घेउन बुंदेलखंडावर चाल करून आला तेंव्हा राजा छत्रसाल याने पेशवे थोरले बाजीराव यांच्याकड़े मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,"जो गति ग्राह गजेन्द्र की सो गत भई है आज ... बाजी जात बुलेंदकी राखो बाजी लाज"
आपल्या २५ हजार घोड़दळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून गेला. त्यानी आधी बंगशची पूर्ण रसद तोडली आणि त्याला मुघल बादशाह कडून कुठलीच मदत मिळू दिली नाही. जयपुरकडून बंगशचा मुलगा कैमखान बापाच्या मदतीस धावला पण बाजीरावने त्याचा जयपुरजवळ पूर्ण पराभव केला. आता बंगशने पूर्ण शरणागती पत्करली आणि 'राजा छत्रसाल' वर पुन्हा हल्ला करणार नाही असे कबूल करून आपली सुटका करून घेतली. राजा छत्रसालने बाजीरावला केलेल्या मदतीबद्दल त्याचा काल्पी, झांसी, सागर, सिरोंज, हरदेनगर हा वार्षिक महसूल ३३ लाख उत्पन्नाचा भाग बाजीरावास बहाल केला.
२३ मे १७३७ - पोर्तुगीझांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुनश्च बांधून घेतला.
Wednesday, 20 May 2009
२१ मे १६७४
२० मे १६६५
Monday, 18 May 2009
१९ मे १६७४
Friday, 15 May 2009
१६ मे १६४९
१६ मे १६४९ - विजापुरच्या आदिलशहा कडून शहाजीराजांची सुटका झाली.
ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
Thursday, 14 May 2009
१५ मे १७३१
१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.
Wednesday, 13 May 2009
१४ मे १६५७

Tuesday, 12 May 2009
१३ मे १८१८
Monday, 11 May 2009
१२ मे १६६६
Sunday, 10 May 2009
११ मे १७३९
४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
Saturday, 9 May 2009
१० मे १८१८
Thursday, 7 May 2009
९ मे १६६०
९ मे १६६० - शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला.
शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
Tuesday, 5 May 2009
६ मे १६५६
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
Monday, 4 May 2009
५ मे १६६३
५ मे १६६३ - गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.
१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.
Sunday, 3 May 2009
४ मे १७३९
४ मे १७३९ - वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले,"किल्ला जिंकता येत नाही तर किमान माझे मुंडके तोफेने उडवून किल्ल्यात जाउन पडेल असे तरी करा."
ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.
Saturday, 2 May 2009
३ मे १८१८
१ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.
Friday, 1 May 2009
१ मे १९६०
१ मे १९६० - महाराष्ट्र दिन.
१ मे २००९ पासून सुरू होणारे वर्ष हे महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
***** संयुक्त महाराष्ट्रचे गीत ... !
जनतेच्या सत्तेची ज्योत जागती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! धृ
फिरंग्यास गोव्याच्या चारूनी खडे ... माय मराठी बोली चालली पुढे ... !
एकभाषिकांची हो येथ संगती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! १
सह्य पठारीच्या तेजस्वी रणकथा ... रंगती शाहीर मुखे अजुनी एकता ... !
इतिहासी एक मिळे स्फूर्ति अन् गती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! २
कोकणच्या दुःखाची तरल स्पंदने ... नागपूरी जनतेची हलविती मने ... !
माय एक धरणीला जेथ मानती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ३
शेतकरी जमिनीचा एथल्या धनी ... कामगार जनतेचा येथ अग्रणी ... !
श्रमजीवी सत्तेची जेथ शाश्वती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ४
भिन्न धर्म जातीची सर्व बंधने ... तोडुनिया एकजीव जाहली मने ... !
लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... ! ५
कवि – कै. डॉ. सुधीर फडके ...
मूळ गायक – शाहिर अमर शेख ...
१ मे १६६५
१ मे १६६५ - पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले. दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.
१ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
Thursday, 30 April 2009
३० एप्रिल १६५७
३० एप्रिल १६५७ - शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करून ते लुटले.
Tuesday, 28 April 2009
२९ एप्रिल १६६१
२९ एप्रिल १६६१ - शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.
Thursday, 23 April 2009
२४ एप्रिल १६७४
२४ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २४ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश. २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.
Wednesday, 22 April 2009
२२ एप्रिल १८१८
Monday, 20 April 2009
२१ एप्रिल १७००
२१ एप्रिल १७०० - दख्खन स्वारीमध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला जिंकला. आता त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले.
२१ एप्रिल १७७९ - सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.
Sunday, 19 April 2009
२० एप्रिल १७४०
२० एप्रिल १७७५ - नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहाँगीर देउन सत्कार. नारों शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलाला जहाँगीर दिली गेली.
Saturday, 18 April 2009
१९ एप्रिल १८१८
१९ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १७ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.
Friday, 17 April 2009
१८ एप्रिल १७०३
१८ एप्रिल १७७४ - पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म.
Thursday, 16 April 2009
१७ एप्रिल १६७५
१७ एप्रिल १६७५ - फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपति शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.
१७ एप्रिल १७२० - बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.
१७ एप्रिल १७३९ - छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.
Wednesday, 15 April 2009
१६ एप्रिल १७७५
१६ एप्रिल १७७५ - आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.
Tuesday, 14 April 2009
१५ एप्रिल १६४५
१५ एप्रिल १६६७ - शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.
१५ एप्रिल १६७३ - स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१५ एप्रिल १७३९ - वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.
Monday, 13 April 2009
१४ एप्रिल १६६५
१४ एप्रिल १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखानाने वज्रमाळ किल्ला जिंकला. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.
१४ एप्रिल १८९५ - लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने रायगडावर पहिला २ दिवसीय शिवस्मरण दिन साजरा.
१३ एप्रिल १७०४
१३ एप्रिल १७३१ - छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.
Saturday, 11 April 2009
१२ एप्रिल १७०३
१२ एप्रिल १७०३ - मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु. औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.
११ एप्रिल १७३८
११ एप्रिल १७३८ - वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.
Thursday, 9 April 2009
१० एप्रिल १६९३
तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी भेट कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.
Wednesday, 8 April 2009
९ एप्रिल १६३३
९ एप्रिल १६६९ - उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.
Tuesday, 7 April 2009
८ एप्रिल १६५७
८ एप्रिल १६७४ - राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद हंभिरराव मोहिते यांस बहाल.
८ एप्रिल १६७८ - 'दक्षिण दिग्विजय' मोहिम जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांचे पन्हाळगड येथे आगमन.
८ एप्रिल १७८३ - आनंदराव धुळूप यांनी इंग्रज आरमाराविरुद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.
Monday, 6 April 2009
७ एप्रिल १८१८
७ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.
Sunday, 5 April 2009
६ एप्रिल १७५५
२२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज - पेशवे तहाप्रमाणे इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.
Saturday, 4 April 2009
५ एप्रिल १६६३
चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला.
************************************************************************************
५ एप्रिल १७१८ -मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."
Friday, 3 April 2009
४ एप्रिल १७७२
४ एप्रिल १७७२ - पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.
३ एप्रिल १६८०

तव शौर्याचा एक अंश दे ... ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ... !
तव तेजांतिल एक किरण दे ... ! जीवनांतला एकच क्षण दे ... !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ... ! पुसू पानिपत ... !
पुन्हां लिहाया अमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत ... !
Thursday, 2 April 2009
२ एप्रिल १७२०
२ एप्रिल १७२० - छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन.
Monday, 30 March 2009
३१ मार्च १६६५
३१ मार्च १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु.
मिर्झा जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी २९ मार्च येऊन दाखल झाले होते.
३० मार्च १६४५
या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.
http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post.html
Friday, 27 March 2009
२७ मार्च १६६७
२७ मार्च १६६७ - शिवरायांना सोडून आधी आदिलशाही आणि मग मुघलांना शामिल झालेल्या नेतोजी पालकरांचे औरंगजेबकडून धर्मांतर. नेतोजी पालकरांचा मुहंमद कुली खान बनवला गेला.
Tuesday, 24 March 2009
२४ मार्च १६७७
भागानगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्र स्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपुर' असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.
Saturday, 21 March 2009
२२ मार्च १७५५
यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.
Friday, 20 March 2009
२१ मार्च १६८०
ह्या नंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.
Wednesday, 18 March 2009
१९ मार्च १६७४
१९ मार्च १६७४ - राजाभिषेका पूर्वी शिवरायांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई वारल्या.
Monday, 16 March 2009
१६ मार्च १६७३
१६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगड येथे पोचले.
अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने ६ मार्च १६७३ रोजी किल्ला जिंकला होता.
Friday, 13 March 2009
१५ मार्च १६८०
त्यांचे नाव लग्नानंतर बदलून 'सिताबाई' असे ठेवले.
१४ मार्च १६४९
१४ मार्च १६४९ - शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र लिहले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती.
ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
Wednesday, 11 March 2009
११ मार्च १६८९
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वधु - तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.

महा पराक्रमी परम प्रतापी एक हि शंभू राजा था ... ।
तेजः पुंज तेजस्वी आँखे निकल गयी पर झुका नही ... ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का दिव्य स्वप्न तो मिटा नही ... ।
दोनो पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नही ... ।
हाथ कटे तो क्या हुआ ? सत्कर्म तो छुटा नही ...।
जिव्हा कटी खुन बहाया धर्म से सौदा किया नही ... ।
गर्व से हिन्दू कहने मे कभी किसीसे डरा नही ... ।
राम कृष्ण शालीवाहन के पथ से विचलीत हुवा नही ... ।
शिवाजी काही बेटा था गलत राह पर चला नही ... ।
वर्ष तीनसौ बीत गये शंभू के बलिदान को ... ।
कौन जिता कौन हारा ? पुछ लो संसार को ... ।
कोटी कोटी कंठो मे तेरा आज गौरव गान है ... ।
अमर शंभू तू अमर हो गया तेरी जयजयकार है ... ।
भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढाया था ... !
है दूजा दुनिया मे कोई जैसा शंभू राजा था ?
..... शाहीर योगेश ...
Monday, 9 March 2009
११ मार्च १८१८
११ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला.
४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.
१० मार्च १७०४
१० मार्च १६७७ - ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.
१० मार्च १७०४ - औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवसाला तोरणा उर्फ़ प्रचंडगड़ जिंकला.
Sunday, 8 March 2009
९ मार्च १६५०
८ मार्च १६७०
८ मार्च १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर-वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला.
ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी अतोनात प्रयत्न केले, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.
Wednesday, 4 March 2009
७ मार्च १६४७
७ मार्च १६४७ - दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
६ मार्च १६७३
६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने किल्ला जिंकला. अन्नाजी दत्तो, गणोजी कावले आणि मोत्याजी खालेकर हे सोबतचे सरदार.
शिवरायांनी पन्हाळ्यावरुन सुटका करून घेतल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला होता. तो राजाभिषेकापूर्वी स्वराज्यात यावा असे शिवरायांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी कोंडाजीला रायग़डी बोलावून मोहिमेआधीच सोन्याचे कड़े बक्षिष म्हणून दिले आणि यशस्वी होउन या असे सांगूनच मोहिमेवर पाठवले.
५ मार्च १६६६
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
Monday, 2 March 2009
४ मार्च १८१८
आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.
३ मार्च १६६५
3 वर्षात शिवाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. शाहिस्तेखानाची बोटे कापली. सुरत बेसुरत केली आणि त्यावर मोगल सरदारांना पत्र लिहून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळवले होते. आता औरंगजेबाला आपला सर्वात जिगरबाज सरदार दखखनेमध्ये पाठवणे भाग होते.
२ मार्च १८१८
Friday, 27 February 2009
२७ फेब. १७३१
२७ फेब.- आज मराठी भाषा दिन.. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ... !
२७ फेब. १७३१ - शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्हाड येथे एकमेकांची भेट घेतली.
Wednesday, 25 February 2009
२६ फेब १९६६
२६ फेब १९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.
शनिवारी सकाळी १०-३० वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी देह-विसर्जन.
२७ ला महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना.
मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार.
Saturday, 21 February 2009
२५ फेब. १८१८
२५ फेब. १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब. ला चाकणचा किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.
२४ फेब. १६७०
पालथे जन्मल्यामुळे राजांनी " पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले ...! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील ... !" असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले.
पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.
२३ फेब. १७३९
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.
Friday, 20 February 2009
२१ फेब. १७०७
२१ फेब्रुवरी १७०७ - औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर.
श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.
Thursday, 19 February 2009
१९ फेब. १६३०
चला तर मग श्री शिवछत्रपती महाराज जयंती पासून श्रीगणेशा करूया ... !
१९ फेब. १६३० - श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस , किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )
***********************************************************************************